आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narmada Bath Removes Many Defects, Special Measures To Know

नर्मदा जयंती आज : जाणून घ्या आख्यायिका आणि नर्मदेमध्ये स्नान करण्याचे लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (६ फेब्रुवारी, गुरुवार) नर्मदा जयंती आहे. धर्म शास्त्रानुसार नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. एवढेच नाही तर या नदीमध्ये स्नान केल्याने कालसर्प दोषाची शांती होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याने कोणकोणते लाभ होतात.

1 - जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने कोणत्याही महिन्यातील अमावस्या तिथीला नर्मदा नदीमध्ये स्नान करावे आणि चांदीपासून बनवलेल्या नागाची पूजा करून तो नाग नदीमध्ये प्रवाहित करावा. हा छोटा उपाय केल्यास कालसर्प दोषाची शांती होते तसेच दुष्प्रभाव कमी होतो.

2 - कोणत्याही मनुष्याच्या कुंडलीतील उग्र ग्रहाला शांत करण्याची शक्ती नर्मदा नदीमध्ये आहे. मंगळ, शनी, राहू, केतूचे दोष या नदीमध्ये स्नान केल्याने दूर होऊ शकतात. विशेषतः शनिश्चरी अमावास्येच्या दिवशी नर्मदा नदीमध्ये स्नान केल्यास सर्व बाधा दूर होतात.