आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navratri 2014 And Prediction On All Zodiac Sign, Divya Marathi

नवरात्रीमध्ये जुळून येत आहेत अद्भुत योग, तुमच्यासाठी कसे राहतील 9 दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारदीय नवरात्री 25 सप्टेंबरला सुरु होत आहे. या वर्षी नवरात्रीला काही अद्भुत योग जुळून येत आहेत. नवरात्रीची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. गुरुवारचा कारक ग्रह सध्या उच्च कर्क राशीमध्ये स्थित आहे. तसेच शनि तूळ राशीत उच्चेचा आहे. यापूर्वी 2002 मध्ये उच्च गुरूच्या योगामध्ये नवरात्री आली होती, परंतु त्यावेळी शनि उच्चेचा नव्हता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च गुरुसोबत नवरात्रीचा योग जवळपास 12 वर्षांमध्ये एकदाच जुळून येतो.
पंचांगांमध्ये आहे तिथींचा भेद
विविध पंचांगानुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये तिथीचा क्षय होईल. या कारणामुळे नवरात्री आठ दिवस साजरी केली जाईल. काही पंचांगांमध्ये अष्टमी व नवमीला एकत्रित मानण्यात आले असून काही पंचांगांमध्ये नवमी-दशमी तिथीला एकत्र मानण्यात आले आहे. यानुसार नवरात्री नऊ दिवस राहील. या संदर्भात आपल्या भागातील विद्वानांकडून तिथीची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

पुढे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील नवरात्री....