आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्ष 2017 मध्ये नावाच्या पहिल्या मराठी अक्षरावरून जाणून घ्या,10-10 खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नावाच्या पहिल्या अक्षराचे ज्योतिष शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व सांगण्यात आले आहे. प्राचीन मान्यतेनुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो, त्या राशीनुसार नावाचे पहिले अक्षर निर्धारित केले जाते. चंद्राच्या स्थितीनुसार आपल्या नावाची रास मानली जाते. सर्व 12 राशींसाठी वेगवेगळे अक्षर सांगण्यात आले आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरापासून रास माहिती होते आणि त्या राशीनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याशी संबंधित माहिती जाणून घेतली जाऊ शकते.

मेष
नामाक्षर : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ

1. राशिचक्रातील सर्वात पहिली रास मेष आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून धातू संज्ञक ही राशी चर (चलित) स्वभावाची असते. राशीचे प्रतीक मेंढा हा संघर्षाचे प्रतीक आहे.
2. मेष राशीच्या व्यक्ती आकर्षक असून त्यांचा स्वभाव रुक्ष असतो. दिसायला सुंदर. कुणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही. यांचे चारित्र्य स्वच्छ.पारदर्शी तसेच आदर्श असते.
3. बहुमुखी प्रतिभेचे स्वामी. समाजात यांचे वर्चस्व असून मान.सन्मानाही मिळत असतो.
4. निर्णय घेण्यात घाई करतात तसेच एकदा काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत.
5. या व्यक्तींचा स्वभाव कधी कधी विरक्तीचाही असतो.
6. मोह या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात नाही. इतरांची मदत करण्यात आनंद मानतात.
7. कल्पनाशक्ती अगाध असून विचार जास्त करतात.
8. अग्नितत्व असल्यामुळे राग लवकर येतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार असतात.
9. स्वतःचा अपमान लवकर विसरत नाहीत, मनातच दाबून ठेवतात. संधी मिळाल्यानंतर बदला घेण्यास विसरत नाहीत.
10. स्वतःच्या मतावर ठाम राहतात. यांच्यामध्ये एक कलाकार लपलेला असतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर राशीच्या खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...