आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारी ते डिसेंबर : वाचा, तुमच्यासाठी कसे राहतील 2015 मधील बारा महिने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2015 ला सुरुवात झाली असून या वर्षातील 365 दिवस तुमच्यासाठी कसे राहतील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर...वाचा, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितेलेले वार्षिक राशिभविष्य. येथे तुमचे आरोग्य, कुटुंब, करिअर, व्यवसायसंबंधित भविष्य तसेच 12 महिन्यांचे राशिभविष्य सांगण्यात येत आहे.
मेष...
आरोग्य
या वर्षी आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. शनीच्या दशेमुळे वारंवार नव्या समस्या उद्भवतील. जखमही होऊ शकते. वाहन चालवताना खबरदारी बाळगा. तसेच वाद-विवादांपासून दूर रहा. सहकार्‍यांपासूनही खबरदार.

कुटुंब
कुटुंबाचे पूर्णपणे सहकार्य मिळेल. केवळ नातेवाइकांकडून अधिक अपेक्षा न केल्यासच बरे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल व सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. दूरच्या नातेवाइकांची भेट होईल तसेच येणे-जाणे सुरूच राहील.

करिअर
शनीची दशा असल्यामुळे वारंवार कामाचे स्वरूप बदलावे वाटेल. परंतु असा निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी वाद वाढतील. नोकरीत बदलीची शक्यताही उद्भवेल. बॉसकडून समस्या निर्माण होऊ शकते.

व्यवसाय
या वर्षी गुंतवणूक इत्यादींबाबतीत पूर्ण खबरदारी बाळगा. कुणाला न सांगता व्यवहार करू नका. व्यापारवृद्धीचा विचार असल्यास थोडी वाट पाहावी लागेल. आपल्या गोपनीय व्यावसायिक गोष्टी स्वत:पर्यंतच मर्यादित ठेवा. अन्यथा नुकसान होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणी वाचा, 12 राशींचे 12 महिन्यांचे राशिभविष्य.....