आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो किंवा पुरुष, करंगळी लगेच सांगते तुम्ही चतुर आहात की नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यतः आपल्या हातावरील सर्वात लहान बोटाकडून(करंगळी) जास्त वजनदार आणि मोठे काम केले जाऊ शकत नाहीत. हे बोट इतर बोटांच्या मदतीने वजनदार आणि मोठे काम करण्यात मदत करते, परंतु हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार एकटी करंगळी स्वभावाच्या विविध गोष्टी सांगते. करंगळीच्या लांबी आणि जाडीवरून तसेच यावर स्थित असलेल्या वेगवेगळ्या चिन्हांचा आणि रेषांचा अभ्यास केला जातो. या छोट्या-छोट्या संकेतांवरून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या भविष्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे.

हात, अंगठा, बोटांची बनावट आणि रेषा पाहून व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावाच्या गोष्टी सांगणाऱ्या विद्येला हस्तरेषा ज्योतिष म्हणतात. या शास्त्राच्या माध्यमातून भविष्यवाणी केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, करंगळीवरून कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाच्या गोष्टी समजू शकतात...

- जर हातावरील करंगळी सामान्य लांबीपेक्षा छोटी असेल तर असा व्यक्ती घाईगडबडीत काम करणारा असतो.

- ज्या लोकांची करंगळी पुढील भागात टोकदार असते, ते बुद्धिमान असतात. अशा लोकांची बुद्धी तल्लख असते.

- करंगळी सामान्य लांबीपेक्षा जास्त लांब असेल तर व्यक्ती जास्त चतुर असतो. हे लोक आपल्या चातुर्याने कामामध्ये यश प्राप्त करतात.