ज्योतिष शास्त्रामध्ये हातांवरील रेषांना खूप महत्व देण्यात आले आहे. हस्तरेषा विद्या ही प्राचीन विद्या म्हणून ओळखली जाते. या विद्येचा अभ्यास करणा-या व्यक्तिला हातावरील रेषा पाहून अचूक भविष्य सांगता येते. हातावरील रेषा पाहून व्यक्तिच्या आयुष्यातील गुढ माहिती मिळवण्याचे काम ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ति सांगू शकतो. हातावरील मणिबंध भाग पाहून तुमच्या आयुष्यात आणि भविष्यात काय घडू शकते याची माहिती जाणून घेणे शक्य आहे.
कुठे असतो मणिबंध-
हाताचा तळभाग जिथून सुरू होतो, तिथे अडव्या काही रेषा असतात. या रेषांना मणिबंध या नावाने ओळखले जाते. हाताचा हा भाग पाहून व्यक्तीच्या वय आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी समजू शकतात. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार मणिबंध पाहून व्यक्तीच्या वयाबद्दलही जाणून घेणे शक्य आहे.
मणिबंधामुळे कोणती माहिती मिळते?
जर एखाद्या व्यक्तिच्या हाताचा हा भाग भरीव, मांसल असेल, मनगटारचे हाड दिसत नसेल तर हे शुभ लक्षण मानले जाते. मणिबंधच्या जागेवरील भाग सुंदर असेल तर, तो व्यक्ती भाग्यवान ठरतो, असे शास्त्रामध्ये सांगितले आहे.
पुढे जाणून घ्या, मणिबंधाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...