आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम-प्रसंग आणि लग्नाशी संबंधित गोष्टी सांगतात हातावरील या रेषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न किंवा प्रणय रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक प्रणय रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात.

आपल्या हातावरील छोट्या छोट्या रेषांमध्ये सतत काहीतरी बदल होत असतात.परंतू काही विशिष्ट रेषांमध्ये काहीच परिवर्तन होत नाही. यामध्ये जीवन रेषा, भाग्य रेषा, हृदय रेषा, मणिबंध, सूर्य रेषा आणि विवाह रेषा यांचा सामावेश आहे.

कुठे असते विवाह रेषा - विवाह रेषा लिटिल फिंगर (करंगळी) च्या खालच्या बाजूला असते. काही लोकांच्या हातावर एक विवाह रेषा असते तर, काहींच्या हातावर एकापेक्षा जास्त. करंगळीच्या खाली असलेल्या भागाला बुध पर्वत असे म्हणतात. तेथे असलेल्या रेषांना विवाह रेषा म्हणतात.

येथे जाणून घ्या, विवाह रेषेशी संबंधित खास गोष्टी...