आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही रेषा सांगते, पैशासोबातच मान-सन्मान मिळणार की नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातावर दिसणार्‍या रेषा आपले भूत, भविष्य आणि वर्तमान सांगतात. हातावरील प्रत्येक रेषेचे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक रेषा वेगळ्या विषयासंबधी भविष्यवाणी करते. सूर्य रेषेवरून व्यक्तीला जीवनात किती मान-सन्मान, पैसा मिळणार हे समजते. येथे जाणून घ्या, सूर्य रेषा संदर्भातील खास गोष्टी..

हातावर कोठे असते सूर्य रेषा...
सूर्य रेषा अनामिकेच्या (रिंग फिंगर) ठीक खालील भाग असलेल्या सूर्य पर्वतावर असते. या भागावर जी रेषा उभ्या स्थितीमध्ये असते, तिला सूर्य रेषा म्हणतात. सूर्य पर्वतावर असल्यामुळे या रेषेला सूर्य रेषा असेही म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर ही रेषा दोष रहित असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर मान-सन्मान आणि पैसा मिळतो. सामान्यतः ही रेषा प्रत्येक व्यक्तीच्या हातावर नसते. अनेक परिस्थितीमध्ये सूर्य रेषा हातावर असून देखील व्यक्तीला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.
पुढे जाणून घ्या, कोणत्या प्रकारची सूर्य रेषा शुभफळ देते आणि सूर्य रेषेवर एखादे चिन्ह असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...