आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palmistry About Life Line (Aayushya Resha) In Hand

हातावरील ही एक खास रेषा तुटलेली असेल तर होऊ शकत नाही भाग्योदय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात प्राप्त होणर्‍या सुख आणि दुःखाचे पूर्वानुमान हस्तरेषा भविष्याच्या माध्यमातून लावले जाऊ शकते. प्रत्येकाच्या हातावर वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा असतात आणि या सर्व रेषांवरून वेगवेगळी भविष्यवाणी केली जाते. हातावरील आयुष्य रेषेचे अध्ययन करून वय आणि सुख-दुःखाशी संबधित विविध गोष्टी समजू शकतात. हातावरील हे रेषा तुटलेली असेल तर व्यक्तीला मृत्युसमान कष्ट मिळतात. येथे जाणून घ्या, आयुष्य रेषा पाहून कशाप्रकारे समजू शकतात भविष्य आणि स्वभावाच्या गोष्टी.

हातावर कोठे असते आयुष्य रेषा -
हातावर सामान्यतः तीन रेषा मुख्य रुपात दिसतात. या तीन रेषा आयुष्य, मस्तिष्क आणि हृदय रेषा असतात. यामधील जी रेषा अंगठ्याच्या खालील शुक्र पर्वताला घेरलेली असते, ती आयुष्य रेषा असते. ही रेषा इंडेक्स फिंगरच्या खाली स्थित असलेल्या गुरु पर्वतापासून सुरु होऊन हाताच्या शेवटी मणिबंधकडे जाते. आयुष्य रेषा तुटलेली असेल आणि या रेषेसोबत इतर कोणतीही रेषा समान अंतरावर चालत असेल तर या रेषेचा अशुभ प्रभाव नष्ट होतो.

अशी आयुष्य रेषा असते अशुभ -
आपल्या हातावरील आयुष्य रेषा ज्याप्रमाणे असते ठीक त्याचप्रमाणे आपले आयुष्य चालते. जर ही रेषा इतर छोट्या-मोठ्या रेषांमुळे तुटलेली असेल तर हा अशुभ संकेत मानला जातो. आयुष्य रेषा जेवढी मोठी असते तेवढेच जास्त आपले आयुष्य राहते.

पुढे जाणून घ्या, या रेषेशी संबंधित इतर काही खास गोष्टी....