आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchak Start From 8 June, Monday, Don't Do This 5 Works.

सोमवारी सकाळपासून सुरू होणार पंचक, ही 5 कामे करणे टाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
हिंदु धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी मुहुर्ताचा विचार केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार काही नक्षत्र स्वयंसिद्ध असतात. म्हणजेच या नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणे चांगले ठरते. तर काही नक्षत्रांमध्ये ते वर्ज्य मानले जाते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती हाही अशाच नक्षत्रांचा गट आहे. धनिष्ठा सुरू झाल्यापासून रेवती नक्षत्र संपेपर्यंतच्या काळास पंचक म्हणतात.

यावेळी पंचकाचा प्रारंभ 8 जून, सोमवारी पहाटे 04.46 पासून होईल. तो 12 जून, शुक्रवारी सकाळी 09.34 पर्यंत असेल. भारतीय ज्योतिषाच पंचक हा अशुभ काळ मानला गेला आहे. त्यामुळे या काळात काही कामे करणे टाळले जाते. जाणून घ्या कोणती पाच कामे या काळात करायला नको ते...
1. पंचकादरम्यान घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड जमा करू नये. त्यामुळे अग्निचे भय राहते.
2. पंचक असताना दक्षिण दिशेला प्रवास करू नये. कारण दक्षिण दिशा यमाची दिशा समजली जाते. या नक्षत्रांमध्ये दक्षिण दिशेची यात्रा करणे धोकादायक मानले गेले आहे.
3. पंचकात रेवती नक्षत्र असेल तेव्हा घराचे छत तयार करू नये. त्यामुळे घरात वाद होतात असे म्हटले जाते.
4. पंचक काळात खाट किंबा बाज तयार करणेही अशुभ मानले जाते. तज्ज्ञांच्या मते त्यामुळे मोठे संकट येण्याची शक्यता असते.
5. पंचकामध्ये अंत्यसंस्कार करण्यापूर्वीही सल्ला घ्यायला हला. तसे शक्य न झाल्यास पीठ किंवा गवतापासून पाच पुतळे तयार करून तिरडीवर ठेवावी त्यांचाही पार्थिवाप्रमाणे अंत्यसंस्कार करावा. त्यामुले पंचकाचा दोष कमी होतो, असे गरूड पुराणात म्हटले आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या नक्षत्रांबाबत...