आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला : सूर्य-शनीमुळे होत आहेत हे क्रूर हल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 डिसेंबर रोजी ऑस्ट्रलियामध्ये आणि 16 डिसेंबरला पाकिस्तानमधील पेशावर येथे दहशतवादी हल्ले झाले आणि अनेक लोक अकाली मृत्यूला बळी पडले. या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या शनि आणि सूर्याची स्थिती अशुभ योग तयार करत आहे. सूर्य आणि शनीमुळे दहशतवादी हल्ल्याचे योग जुळून आले आहेत.

पं. शर्मा यांच्यानुसार सध्या मंगळाची स्वामित्व असलेली रास वृश्चिकमध्ये शत्रू ग्रह शनि स्थित आहे. तसेच शनीचा शत्रू सूर्य ग्रहसुद्धा याच राशीत स्थित आहे. मंगळ उच्चेचा असून गुरु ग्रह वक्री झाला आहे. हाच संयोग दहशतवाद वाढवणारा आहे. गुरु वक्री झाल्यामुळे वृश्चिक राशीत स्थित शनि 'बली' झाला आहे. शनीची ही स्थिती भ्याडपणा करणाऱ्या लोकांना बळ देणारी आहे. गुरूची संपूर्ण पाचवी दृष्टी वृश्चिकवर असल्यामुळे शनि शांत होता, परंतु गुरु वक्री झाल्यामुळे या घटना घडत आहेत.16 डिसेंबरच्या संध्याकाळपासून सूर्य वृश्चिक राशीतून निघून जाईल. यामुळे अशाप्रकारच्या घटनांमध्ये कमतरता येईल.

फोटो : हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना शवपेटीतून नेतांना आरोग्य कर्मचारी.