आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pitra Paksha 2015 After 38 Years Start Pitra Paksha In The Lunar Eclipse Become

15 दिवसांचा असेल पितृपक्ष, सूर्य-राहूच्या युतीमुळे जुळून येईल ग्रहण योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून अश्विन मासातील अमावस्येपर्यंत श्राद्धपक्षाचा काळ असतो. या 16 दिवसांमध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केले जाते. या वर्षी श्राद्धपक्षाचा प्रारंभ 28 सप्टेंबर, सोमवारपासून होत असून 12 ऑक्टोबर सोमवारपर्यंत राहील.

उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार श्राद्धपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणात होईल आणि सूर्य-राहूची युती झाल्यामुळे 15 दिवस ग्रहण योग राहील. भारतीय वेळेनुसार 28 सप्टेंबरला सकाळी 7 वाजून 40 मिनिटाला चंद्रग्रहण सुरु होऊन 8 वाजून 53 मिनिटांपर्यंत राहील. परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे याचा वाईट प्रभाव येथील लोकांवर राहणार नाही.
या अगोदरही जुळून आला होता असा योग
पं. भट्ट यांच्यानुसार, 1977 मध्येसुद्धा 27 सप्टेंबर, मंगळवारी चंद्रग्रहणासोबत पितृपक्षाची सुरुवात झाली होती तसेच त्यावेळी सर्वपितृ अमावास्येला सूर्यग्रहणाचा योग जुळून आला होता. त्यावेळी श्राद्धपक्षात दोन ग्रहण आल्यामुळे तो काळ अशुभ मानला गेला होता. परंतु या श्राद्धपक्षामध्ये तर्पण, श्राद्ध इ. कर्माचे शुभफळ प्राप्त होईल.

19 वर्षानंतर जुळून येणार गजछाया योग
उज्जैनचे ज्योतिषी पं. अमर डिब्बेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार श्राद्धपक्षामध्ये सूर्य आणि राहूच्या युतीमुळे गजछाया योग जुळून येत आहे. यापूर्वी 1966 मध्ये हा योग जुळून आला होता. प्रमुख श्राद्ध ग्रंथ मदन पारिजात, कौस्तुभ, अग्नी, लिंग, मत्स्य, पद्म इ. पुराणांनुसार जेव्हा सूर्य-केतूची युती जुळून येते तेव्हा गजचाय योग तयार होतो. या योगामध्ये पितृकर्म (श्राद्ध, तर्पण, पिंडदान) केल्याने त्याचे पाचपट जास्त फळ प्राप्त होते. या योगामध्ये पितरांचे श्राद्ध केल्याने ते पूर्णतः तृप्त होतील आणि श्राद्ध करणाऱ्याला धन-धान्य, पुत्र-पौत्र, सुख-संपत्तीचे सुख प्राप्त होईल.

श्राद्धपक्षात आणखी कोणकोणते योग जुळून येत आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....