आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षासाठी सध्याचा काळ खूप चांगला सुरु आहे. चार मोठ्या राज्यांमध्ये भाजपने विजय प्राप्त करून मतदारांचे मोठे समर्थन मिळवले आहे. या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आहे. या आत्मविश्वासावरच भाजप २०१४ लोकसभा निवडणुकींमध्ये उतरेल.
ज्योतिष शास्त्रानुसार भाजपचे संगठन मिथुन लग्नामध्ये झाले असून याचा भाग्येश शनि आहे, जो पराक्रम स्थानामध्ये स्थित आहे. शनि, मंगळ आणि राहू शत्रुहंता योग तयार करत आहेत. २०१४ या वर्षात शनि, राहू आणि मंगळ भाजपच्या कुंडलीत पंचम स्थानामध्ये भाग्यशाली बनून उच्च राशीमध्ये स्थित राहतील. या योगाच्या प्रभावामुळे पक्षात अंतर्गत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु या सर्व गोष्टींचा भाजपच्या विजयामध्ये जास्त प्रभाव राहणार नाही. सध्या पक्षावर शनीची साडेसाती सुरु असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे यश मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.