आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prediction About Oath Of Narendra Modi 26 May 2014

नरेंद्र मोदींनी शपथविधीसाठी सायंकाळी सहाचाच मुहूर्त का निवडला ? वाचा कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणूकीमध्‍ये अभुतपुर्व विजय मिळवल्‍यानंतर आज सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. देशातील ब-याच लोकांना हा प्रश्‍न नक्‍कीच पडला असेल, की सायंकाळी 6 वाजता शपथ्‍ा घेण्‍याचे काय कारण असेल ? नरेंद्र मोदी यांची हिंदू धर्मावर निष्‍ठा असल्‍यामुळे प्राचीन परंपरेचे पालन करणा-या पैकी मोदी हे एक आहेत. शास्‍त्रानुसार सायंकाळची 6 ची वेळ ही शुभ कार्यायाठी योग्‍य मानली जाते. 6 च्‍या वेळेला शास्‍त्रामध्‍ये गोधुली बेला म्‍हणून ओळखले जाते. यावेळा केलेले कार्य हे स्थिर सफलता प्राप्‍त करून देतात. यामुळे थपथविधीसाठी मोदी यांनी सायंकाळी 6 चा वेळ निर्धारीत केला आहे.
मोदींसाठी आजचा दुर्लभ योग-
हिंदू पंचांगानुसार आज ज्‍येष्‍ठ महिन्‍यातील कृष्‍ण पक्षातील त्रयोदशी तिथिसोबतच भरणी नक्षत्राचा योग्‍ा आलेला आहे. या नक्षेत्रात स्‍वामी शुक्र आहे. यामुळे मोदी यांना सरकार चालवण्‍यासाठी आडचणी निर्माण होणार नाहीत. उज्जैनच्‍या ज्‍योतिषाचार्य पं.मनीष शर्मा यांच्‍या मतानुसार आजचा दिवस आणि भारताला मिळालेले स्‍वातंत्र याचा वेगळ्या प्रकारचा संबंध आहे. 15 ऑगस्‍ट 1947 ला कृष्‍ण पक्षातील त्रयोदशी तिथी होती. आज हा योग आलेला असल्‍यामुळे मोदी यांच्‍या शपथविधीला विशेष महत्त्व प्राप्‍त झाले आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या देशासाठी 'मोदी सरकार' कसे राहील...