आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professional Life And Career Horoscope 2015 In Marathi

जाणून घ्या, 2015 मध्ये कोणाला मिळणार प्रमोशन कोणाचा वाढणार पगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नववर्ष 2015 सुरु झाले असून येणार्‍या 365 दिवसांमध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी राहणार हे जाणून घेण्यास तुम्ही इच्छुक असाल तर वाचा, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेले खास राशिभविष्य. या वर्षात तुम्हाला प्रमोशन मिळणार की नाही? नोकरीच्या शोधात असणार्‍यांना मनासारखी नोकरी मिळणार की नाही? पगार वाढणार की नाही? व्यवसायात नफा होणार की तोटा? विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसे राहणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घ्या...

मेष -
प्रोफेशनल लाईफ आणि करिअर :

वर्ष 2015 हे मेष राशींच्या लोकांसाठी व्यापार, व्यवसाय आणि धन-संपत्तीच्या दृष्टीने फार चांगले राहाणार नाही. या वर्षी व्यापार आणि व्यवसायात विशेष फायदा होण्याची शक्यता नाही. यावर्षी वाचा आणि रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. काही बोचणारी गोष्ट किंवा कडवे वचन तुमच्या कामात अडथळा ठरु शकते. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून मोठे आव्हान मिळू शकते. व्यवसाय आणि कामकाज विस्तारासाठीची योजना तयार करताना साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करु शकता. तुम्हाला तुमच्या दैनंदिन खर्चासाठी आणि व्यापारासाठी कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

या वर्षी गुरु चौथ्या उच्च स्थानी राहाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. यावर्षी करिअरमध्ये नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही यश आणि किर्तीकडे प्रवास कराल. तुमच्या सहकार्यांशी तुमचे भावनिक नातेसंबंध निर्माण होतील. जर तुम्ही आधीपासूनच नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसे झाले नाही, तर त्याचा परिणाम सहन करावा लागेल. वैयक्तिक आयुष्याला तुमच्या करिअरवर वरचढ होऊ देऊ नका. खर्च नियंत्रीत ठेवा. यावर्षी टॅक्स संबंधीची त्रास होण्याची शक्यता आहे.

३१ जुलै ते १५ सप्टेबर या काळात व्यापारात कोणताही निर्णय घेण्याचे टाळा. याकाळात वित्त हानी होण्याची शक्यता आहे. करिअर आणि पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. मात्र त्याचवेळी मनाप्रमाणे काम झाले नाही तर, निराश होऊ नका. अभ्यासात लक्ष द्या, यश मिळेल. वास्तविक करिअर आणि नोकरीत यावर्षी तुम्हाला फार यश मिळणार नाही. यावर्षी या राशीचे लोक नोकरीसाठी मुलाखत आणि निकालाची वाट पाहात आहेत त्यांना मेहनतीपेक्षा कमी निकाल मिळू शकतो. परदेशात जाऊन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात.

इतर राशींचे भविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...