आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

297 वर्षांनंतर वैशाख पौर्णिमेला दुर्लभ योग, करा हे खास उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
297 वर्षांनंतर 10 मे, बुधवारी येत असलेल्या वैशाख पौर्णिमेला बुधादित्य योगाचा महासंयोग जुळून येत आहे. अशाप्रकारच्या योग्य-संयोगाची गणना ज्योतिषमध्ये फार दुर्लभ असते. हा योग स्नान, दान, पुण्यासोबतच खरेदीसाठी शुभ आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांनी सांगितले की, ग्रह गोचर गणनेनुसार नवम-पंचम  स्थानातील गुरु-मंगळ, गुरु-शुक्राचा समसप्तक योग आणि शनी-मंगळाचे षडाष्टक व्यापारात वृद्धीपासून ते ऋतू परिवर्तन करणारे राहील. यापूर्वी वैशाख पौर्णिमेला असा संयोग 22 एप्रिल 1720 मध्ये जुळून आला होता.

स्नान, दान खरेदीसाठी खास आहे हा योग
बुधवारी वैशाख पौर्णिमा असल्यामुळे बुधादित्य सहित विविध ग्रह-नक्षत्रांच्या युतीमुळे शुभ योग जुळून येत आहेत. विशेष म्हणजे पौर्णिमेला सूर्य आपल्या उच्च राशी मेषमध्ये असल्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान, ब्राह्मणाला दान, पितरांसाठी पूजा, यमासाठी लोखंडाचे दान या सर्व कर्मांचे दुप्पट फळ मिळेल. पौर्णिमेला बाजारात खरेदीपासून ते नवीन कामाची सुरुवात समृद्धीकरक राहील.

कोणत्या योगाचा कसा प्रभाव राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...