आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असतील तर गुरुवारी करा हे सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ग्रंथामध्ये गुरुला लग्नाचे देवता मानले गेले आहे. ज्या व्यक्तींचे लग्न जमत नसेल, वैवाहिक आयुष्य सुखी नसेल, अशा व्यक्तींनी गुरुला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत. यासाठी गुरुवार गुरु बृहस्पतीचा वार मानला गेला आहे. या दिवशी विष्णुची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्ती होण्यास मदत होते. तसेच धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले छोटे-छोटे उपाय केल्याने देखील घरात सुख-शांती राहण्यास मदत होते. ज्या नवरा-बायकोमध्ये छोट्या-छोट्या कारणांमुळे नेहमी भांडणे होत असतील अशा व्यक्तींनी खाली दिलेले उपाय केल्यास फायदा होईल.
- गुरुवारपासून हा उपाय करण्यास सुरुवात करावी. गुरुवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर नाभि आणि मस्तकावर केशराचा टिळा लावावा. तसेच गुरुवारी आहारामध्ये केशराचा उपयोग करावा.

- बूंदीचे लाडू, पिवळे फूल, केळी, पिवळे चंदन, हळद , धार्मिक पुस्तके, पिवळ्या रंगाची मिठाई आणि तुपाचे दान करावे.
- पति-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असल्यास बुधवारी एखाद्या केळीच्या झाडाचे पान घरात ठेवावे. गुरुवारी सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र परिधान करावे. केळीच्या पानावर गंगाजल टाक़ून स्वच्छ करावे. यानंतर भगवान विष्णु समोर ठेवून त्याची मनोभावे पुजा करावी. त्यावर हळद, केशर लावून 108 वेळा गुरु मंत्राचा जप करावा.
मंत्र -
ॐ बृं बृहस्पतये नम:।

7 गुरुवारपर्यंत पुजेनंतर केळीचे पान पिवळ्या कपड्यात बांधून हाताच्या मनगटावर बांधावे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी काही उपाय...