शनिवारी दिवसभर दुर्लभ योग राहतील. आज चंद्राच्या स्थितीमुळे अमृत आणि विष दोन योग जुळून येत आहेत. अमृत योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगामध्ये करण्यात आलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होते. या योगाच्या शुभ प्रभावाने ठरवलेले काम पूर्ण होतात तसेच धनलाभ, सुख-शांती, समृद्धीची प्राप्ती होते. विष योगाच्या अशुभ प्रभावाने मानसिक अशांती, तणाव, भीती, अडथळे निर्माण होतात. या अशुभ योगाच्या प्रभावाने धनहानी आणि नुकसान होऊ शकते. एक दिवसात हे दोन योग जुळून येणे कठीण आहे. चंद्राच्या चालीमुळे एकाच दिवशी हे दोन योग जुळून येणे, असे फार कमीवेळा घडून येते.
आज दिवसभर चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये राहील आणि शनिवार असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे. अनुराधा नक्षत्र रात्री साडेनऊ वाजेपर्यंत राहील. शनि आणि चंद्र जेव्हा एकाच राशीत असतात तेव्हा विष योग जुळून येतो. आजच्या कुंडलीनुसार चंद्र वृश्चिक राशीमध्ये शनिसोबत आहे. यामुळे हा विष योग जुळून आला आहे. राशीनुसार सर्व लोकांवर चंद्र आणि इतर ग्रहस्थितीचा शुभ-अशुभ प्रभाव राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)