रविवार, 2 नोव्हेंबर 2014 ला संध्याकाळी 6.45 वाजता शनीने तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून हा शनीचा शत्रू ग्रह आहे. पुढील 27 महिने शनि वृश्चिक राशीमध्ये राहील आणि सर्व 12 राशीवर याचा प्रभाव पडेल. शनीच्या रस परिवर्तन तिथीमध्ये पंचाग भेदही आहेत. काही पंचागांनुसार शनि 1 नोव्हेंबरला शनिवारीच रास बदलत आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार शनीने रास बदलल्यामुळे कन्या राशीची साडेसाती संपेल आणि धनु राशीला सुरु होईल. कर्क आणि मीन राशीची अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) पूर्ण होईल. तूळ राशीच्या अडीचकीचा शेवटचा काळ राहील. वृश्चिक राशीवरील साडेसातीचे प्रथम चरण पूर्ण होईल.
ज्योतिष शास्त्रात शनि -
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह चक्रामध्ये शनीचे स्थान सूर्य ग्रहानंतर सहावे आणि सर्व ग्रहांमध्ये शेवटचे आहे. याचा रंग निळा असून चाल अत्यंत संथ आहे. शनै शनै चालीमुळे या ग्रहाला शनैश्चराय असेही म्हणतात. ज्याप्रकारे पृथ्वी सूर्याची परिक्रमा एक वर्षात पूर्ण करते, ठीक त्याचप्रमाणे शनीला सूर्याची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जवळपास अडीच वर्ष लागतात आणि शनि एका राशीत अडीच वर्ष राहतो....
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पुढील अडीच वर्षाचा काळ तुमच्यासाठी कसा राहील....