आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 मध्ये कोणावर राहणार शनीची वक्रदृष्टी आणि कोण ठरणार भाग्यवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2015 सुरु झाले असून, प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे वर्ष आपल्यासाठी कसे राहणार हे जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. या वर्षात काय चांगले घडणार आणि कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण होतात. हीच जिज्ञासा शांत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत वर्ष 2015 चे शनि राशीफळ. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायाचे देवता मानण्यात आले आहे. कारण मनुष्याला त्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ शनिदेव देतात. वर्ष 2015 मध्ये शनि वृश्चिक राशीत चलायमान राहतील. 14 मार्च ते 15 ऑगस्ट 2015 पर्यंत शनिदेव वक्रीय स्थितीमध्ये राहतील. जाणून घ्या, 2015 मध्ये शनिदेव कशाप्रकारे तुमच्या राशीला प्रभावित करतील...

मेष
वर्ष 2015 मध्ये शनिदेव तुमच्या राशीपासून आठव्या स्थानात चलायमान राहतील. शनीची अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) तुम्हाला चालू आहे. अष्टम शनीच्या प्रभावाने शत्रू त्रास देतील. एकीकडे अष्टम शनि आरोग्यासाठी ठीक नाही तर दुसरीकडे दहाव्या स्थानावरील दृष्टीमुळे नोकरीत चढ-उताराची स्थिती निर्माण होईल. नोकरीत आणि व्यवसायात खूप कठीण प्रयत्नानंतर लक्ष्य प्राप्ती होईल.

14 मार्चपासून 15 ऑगस्टपर्यंत शनि वक्री स्थितीमध्ये राहील. या दरम्यान एखादी मोठी हानी होऊ शकते. कुटुंबात किंवा एखाद्या नातेवाईक, मित्राच्या क्षतीची शक्यता आहे. एखादे काम पूर्ण होता-होता राहील. संपत्तीचे वाद निर्माण होतील. बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर नाराज राहतील.

उपाय -
- एखाद्या ब्राह्मणाकडून किंवा स्वतः शनीच्या तंत्रोक्त, वैदिक मंत्राचा २३००० जप करून घ्या.

मंत्र -
- ऊँ प्रां प्रीं स: श्नैश्चराय नम:

- शनिवारचे व्रत करा. मुंग्यांना साखर टाका

- चप्पल-बूट, काळे कपडे, धान्य, लोखंडाचे भांडे दान करा.

वर्ष 2015 मध्ये शनीचा इतर राशींवर कसा प्रभाव राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...