आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि राशीफळ : कोणावर आहे शनीचा साडेसातीचा प्रभाव, वाचा राशीनुसार उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२८ मे २०१४, बुधवारी शनि जयंती आहे. शास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला शुभ-अशुभ फळ प्रदान करतात. यामुळे शनिदेवाला न्यायाधीश असेही म्हणतात. शनिदेव एकाच वेळी विविध राशींना प्रभावित करतात. शनि जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, वर्तमानात शनिदेव कोणत्या राशीला प्रभावित करत आहेत आणि राशीनुसार खास उपाय.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या शनि कशाप्रकारे तुमच्या राशीला प्रभावित करेल....
मेष - सध्या शनि तुमच्या स्थानापासून सातव्या स्थानामध्ये भ्रमण करीत असून, ही ग्रहस्थिती २ नोव्हेंबरपर्यंत राहील. सातव्या स्थानातील शनीची स्थिती कामाच्या आणि उपजीविकेच्या ठिकाणी ठीकठाक राहील परंतु कौटुंबिक समस्या निर्माण होतील. मुलांची आणि घरातील वृद्ध लोकांची चिंता राहील. पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.

- उपाय
- एखाद्या ब्राह्मणाकडून किंवा स्वतः शनीच्या तंत्रोक्त, वैदिक मंत्राचा २३००० जप करून घ्या.
मंत्र -
- ऊँ प्रां प्रीं स: श्नैश्चराय नम:
- शनिवारचे व्रत करा. मुंग्यांना साखर टाका