आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steps Of Worship Lord Ganesha For Keep Away Bad Effect Of Saturn In Kundal

कुंडलीतील शनिदोषाची या छोट्या गणेश पूजा उपायाने होते शांती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पौराणिक मान्यतेनुसार श्रीगणेशाची पूजा करणाऱ्या भक्तांना शनिदेवाचीसुद्धा कृपा प्राप्त होते. विशेषतः भाद्रपद मासातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवा दरम्यान येणाऱ्या बुधवारी आणि शनिवारी गणपतीच्या पूजेने विघ्ननाश तर शनिदेवाची पूजा संकटमोचक ठरते.

ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील शनिदोषामुळे जीवनात शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणी निर्माण होतात. या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीगणेशाचे स्मरण हा सोपा उपाय मानला गेला आहे. शास्त्रामध्ये श्रीगणेशाच्या एक विशेष मंत्र स्तोत्राचे महत्व सांगण्यात आले आहेत. या स्तोत्राचे पाठ केल्यास कुंडलीतील शनिदोषाचा प्रभाव कमी होतो.