सूर्य ग्रहाने 17 ऑगस्टला सोमवारीच सिंह राशीत प्रवेश केला असून पुढील महिन्याच्या 17 तारखेपर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. यापूर्वी 17 जुलैला सूर्याने रास बदलून कर्क राशीत प्रवेश केला होता. प्रत्येक महिन्यातील सूर्याच्या रास परिवर्तनाचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. सूर्याने रास बदलल्यामुळे काही लोकांना फायदा तर काहींना नुकसान होऊ शकते.
सिंह रास सूर्याची रास आहे. या राशीमध्ये सूर्य आल्यामुळे सर्वांवर याचा जास्त प्रभाव राहील. सूर्याच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल आणि बदलीचे योगही जुळून येतील. काही लोकांच्या आरोग्यामध्ये चढ-उताराची स्थिती राहील. हृदयाचा आजार असलेल्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचार्यांसाठीसुद्धा ही ग्रहस्थिती चांगली राहील. सिंह राशीतील सूर्यामुळे अचानक काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. एकंदरीत काही लोकांसाठी सुखद बदल घडतील तर काही लोकांनी सावध राहावे. राशीनुसार जाणून घ्या, कोणी काय करावे आणि किती लोकांसाठी चांगला राहील हा काळ...