15 जानेवारी, शुक्रवारी मकर संक्रांती आहे. हा मुख्यतः सूर्यदेव पूजनाचा सण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मकरसंक्रांतीला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय केले तर दुर्भाग्याही सौभाग्यात बदलून विशेष फळ प्राप्त होते.
1- ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य नीच स्थितित आहे. त्यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे मनापासून पूजन केल्याने पत्रिकेतील दोष नाहीसे होतात. सूर्य यंत्राची स्थापना अशा प्रकारे करावी.
मकर संक्रांतीला पहाटे सकाळी लवकर उठावे. नित्य कर्म आटोपून घेतल्यानंतर स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करावा. सूर्ययंत्राचा गंगाजल तसेच गायीच्या दूधाने अभिषेक करावा. यंत्राचे विधिपूर्वक पूजन केल्यानंतर सूर्य मंत्राचा जप करावा.
मंत्र: ऊँ घृणि सूर्याय नम:
जप झाल्यानंतर आपल्या देवघरात यंत्राची स्थापना करावी. हा विधी केल्यानंतर जीवनातील सर्वप्रकारच्या समस्या दूर होतील.
मकरसंक्रांतीला करण्यात येणारे काही खास आणि सोपे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....