ज्योतिषीय उपायांमध्ये विशिष्ठ प्रकारच्या नारळांचा उपयोग केला जातो. आज आम्ही तुम्हाला लघु आणि एकाक्षी नारळांची माहिती आणि खास उपाय सांगत आहोत..
लघु नारळ -
हे नारळ सामान्य आकाराच्या नारळापेक्षा थोडेसे छोटे असते. हे नारळ विविध उपायांमध्ये वापरे जाते. विशेषतः धन-संपत्ती प्राप्तीमध्ये याचा उपयोग केला जातो.
- एखाद्या शुभ मुहूर्तावर 11 लघु नारळ देवघरात लक्ष्मीच्या चरणाजवळ स्थापन करून ऊं महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् मंत्राचा 2 माळी जप करा. जप केल्यानंतर नारळ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नारळ नदी किंवा तलावात विसर्जित करा. हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी समाप्त होऊन स्थायी लक्ष्मीचा घरात वास राहील.
- धन, वैभव आणि समृद्धीसाठी 5 लघु नारळ स्थापित करून, त्यावर केशराने टिळा लावा. प्रत्येक नारळावर टिळा लावताना 27 वेळेस खालील मंत्राचा उच्चार करा.
मंत्र- ऐं ह्रीं श्रीं क्लीं
- घरातील धन-धान्य कधीही कमी होऊ नये यासाठी 11 लघु नारळ पिवळ्या कपड्यात बांधून स्वयंपाक घरामध्ये पूर्व दिशेला बांधून ठेवावेत.
पुढे जाणून घ्या, एकाक्षी नारळाची माहिती आणि खास उपाय...