आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन प्राप्तीसाठी उपयोगात येतात या वस्तू, हे आहेत यांचे खास उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिषीय उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील काही वस्तू अत्यंत चमत्कारिक आहेत. या वस्तूंचा विधिव्रत पद्धतीने उपयोग केल्यास सर्व अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला ज्योतिषीय उपायांमध्ये उपयोगात येणार्‍या काही खास वस्तूंची माहिती देत आहोत.

गोमती चक्र
ज्योतिष क्रियेमध्ये एका विशेष दगडाचा वापर केला जातो. दिसायला हा साधारण दगडासारखाच दिसतो. परंतु, त्‍याचा प्रभाव असाधारण असतो. या दगडालाच गोमती चक्र म्‍हणतात. कमी किमतीला मिळणारे हे दगड गोमती नदीत आढळून येतात, म्‍हणून यांना गोमती चक्र म्‍हणतात. गोमती चक्रामुळे विविध समस्या दूर करणे शक्य आहे.

- धन लाभासाठी ११ गोमती चक्र देवघरामध्ये ठेऊन त्‍याची पूजा करावी. त्‍यांच्‍यासमोर 'श्री नम:' मंत्राच जप करावा. असे केल्याने आपण जो व्‍यवसाय किंवा काम करत आहात त्‍यात यश मिळते आणि उत्‍पन्‍नात वाढ होते.

- पोटासंबंधी काही तक्रारी असल्‍यास 10 गोमती चक्र पाण्‍यात रात्रभर घालून ठेवावे आणि सकाळी उठल्‍यानंतर ते पाणी प्‍यावे. त्‍यामुळे पोटाचे विकार दूर होतात.

- गोमती चक्रास जर चांदी किंवा अन्‍य धातूच्‍या डब्‍बीत कुंकू किंवा तांदूळ घालून ठेवल्‍यास लवकरच शुभ फळ मिळते.

- होळी, दिवाळी किंवा नवरात्र सारख्‍या प्रमूख सणांच्‍यावेळेस गोमती चक्राची विशेष पूजा करण्‍यात येते. विशेषत: सर्वार्थसिद्धी योग किंवा रविपुष्‍य योमध्ये यांची पूजा केल्‍यास घरात सुख-शांती कायम राहते.

इतर खास वस्तूंची माहिती आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...