आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thief Panchak Will Start This Afternoon Till 29 September Dont Do This 5 Work

25 ते 29 सप्टेंबरपर्यंत राहील चोर पंचक, करू नका ही 5 कामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये शुभ-अशुभ मुहूर्तसंदर्भात वेगवेगळ्या मान्यता आहेत. हिंदु धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी मुहुर्ताचा विचार केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार काही नक्षत्र स्वयंसिद्ध असतात. म्हणजेच या नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणे चांगले ठरते. तर काही नक्षत्रांमध्ये ते वर्ज्य मानले जाते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती हाही अशाच नक्षत्रांचा गट आहे. धनिष्ठा सुरू झाल्यापासून रेवती नक्षत्र संपेपर्यंतच्या काळास पंचक म्हणतात.

29 सप्टेंबरपर्यंत राहील पंचक
यावेळी पंचकाचा प्रारंभ 25 सप्टेंबर, शुक्रवारी दुपारी 01.12 पासून होऊन 29 सप्टेंबर, मंगळवारी संध्याकाळी 06पर्यंत राहील. शुक्रवारी सुरु होत असल्यामुळे या पंचाकाला चोर पंचक म्हटले जाईल. भारतीय ज्योतिषामध्ये पंचक हा अशुभ काळ मानला गेला आहे. त्यामुळे या काळात काही कामे करणे टाळले जाते. विद्वानांनुसार पंचक 5 प्रकारचे असते...

1. रोग पंचक
रविवारी सुरु होणार्‍या पंचकाला रोग पंचक म्हणतात. याच्या प्रभावाने हे पाच दिवस शारीरिक आणि मानसिक अडचणींचे राहतात. या पंचकमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य करू नये. प्रत्येक प्रकरच्या मंगलकार्यामध्ये हे पंचक अशुभ मानण्यात आले आहे.

2. राज पंचक
सोमवारी सुरु होणार्‍या या पंचाकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावाने पाच दिवसांमध्ये सरकारी कामामध्ये यश प्राप्त होते. राज पंचकमध्ये संपत्तीशी संबंधित कार्य करणे शुभ राहते.

मृत्यू, अग्नि आणि चोर पंचकाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...