शुक्रवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे ब्रह्मा योग जुळून येत आहे. हा शुभ योग अनेक राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. हा शुभ योग दिवसभर राहील. याच्या शुभ प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतील. लोकांची मदत मिळेल. धन लाभही होऊ शकतो. या योगाच्या प्रभावाने कळत-नकळतपणे एखादे चांगले काम तुमच्या हातून घडेल, ज्यामुळे भविष्यात लाभ होईल.
या व्यतिरिक्त शुक्रवारी नऊ ग्रहांची स्थितीसुद्धा काही लोकांच्या फेव्हरमध्ये राहील. शुक्रवार सूर्य, बुध आणी गुरु सिंह राशीत राहतील. कर्क राशीमध्ये शुक्र आणि मंगळ, राहू कन्या आणि केतू मीन राशीत राहील. शनि वृश्चिक राशीमध्ये आहे. पुढे जाणून घ्या, शुक्रवारच्या ग्रह योगाचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहील....