आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : कुंभ राशीत चंद्र, तुमच्या राशीसाठी असा राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी कुंभ राशीत चंद्रामुळे एक शुभ आणि दोन अशुभ योग जुळून येत आहेत. चंद्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये असल्यामुळे मुसळ नावाचा अशुभ योग जुळून येत असून हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने अनेक लोकांना आज अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सोमवारी याच योगाच्या प्रभावामुळे तुमच्या खास कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दररोज जुळून येणाऱ्या शुभ-अशुभ योगांमधील अतिगंड नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने मूड ठीक राहणार नाही तसेच चिडचिड वाढेल.

या दोन अशुभ योगांव्यतिरिक्त आज एक शुभ योगही जुळून येत आहे. सोमवारच्या गोचर कुंडलीमध्ये गुरु आणि चंद्र समोरासमोर आल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा प्रभाव राशीनुसार काहींसाठी कमी तर काहींसाठी जास्त राहील. या योगाच्या प्रभावाने दोन अशुभ योगांचा प्रभाव कमी होईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी आजचे शुभ-अशुभ योग कसे राहतील....
बातम्या आणखी आहेत...