आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिश्चरी अमावस्येचे राशिभविष्य : वाचा, काय करावे आणि काय करू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी अमावस्या असल्यामुळे शनिश्चरी अमावस्येचा योग जुळून येत आहे. शनिवारी इतर ग्रहांच्या स्थितीमुळेसुद्धा काही योग जुळून आले आहेत. चंद्र दिवसभर मीन राशीच्या रेवती नक्षत्रामध्ये असल्यामुळे धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे नियोजित कार्य पूर्ण होतील. मीन राशीतील चंद्र केतूसोबत असल्यामुळे ग्रहण नावाचा योगही जुळून येत आहे. हा योग अशुभ फळ देणारा आहे. या योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. शनिवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे विषकुंभ नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे लोकांचा खर्च वाढू शकतो.

काय करावे -
- शनि मंदिरात तेल अर्पण करावे
- उडदाचे दान करावे
- गरिबांना अन्नदान करावे
- पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे
- हनुमानाच्या चरणावरील शेंदूर कपळावर लावावा.

काय करू नये -
- काळे वस्त्र परिधान करू नये
- तेल किंवा चामड्याची वस्तू खरेदी करू नये
- केस, नखे कापू नये.
- खोटे बोलून पैसा मिळवू नये
- गरीब आणि कामगार लोकांशी वाद घालू नये

शनिश्चरी अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...