आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

राशिभविष्य : का आणि किती खास राहील तुमच्यासाठी गुरुपुष्य योग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी, शुभ आणि लक्ष्मी नावाचे चार शुभ धन दायक योग जुळून येत आहेत. अशाप्रकारे गुरुवार शुभ राहील. या शुभ योगांच्या प्रभावाने लोकांना धनलाभ होईल. या योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतील. महत्त्वपूर्ण कामांच्या योजना तयार होतील. आनंदाची बातमी समजेल. या शुभ योगामध्ये खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पैशांची देवाण-घेवाण या शुभ योगांमध्ये केल्याने लाभ आणि फायदा होतो. एकंदरीत गुरुवारी एवढे शुभ योग जुळून आल्यामुळे अनेकांसाठी हा दिवस खास राहील.

गुरुवारी सर्वार्थसिद्धी आणि अमृत सिद्धी योग सूर्योदयापासून सुरु होऊन रात्री उशिरापर्यंत राहतील. अशाचप्रकारे शुभ आणि लक्ष्मी योगही दिवसभर राहतील. कर्क राशीमध्ये चंद्र आणि मंगळ एकत्र असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. या शुभ योगांच्या प्रभावाव्यतिरिक्त सर्व राशींवर नऊ ग्रहांच्या स्थितीचा खास प्रभाव होत असल्यामुळे काही लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरू शकतो. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...