आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

चंद्रावर आज 4 ग्रहांची दृष्टी, 12 राशींवर असा राहील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्रावर शनि, मंगळसोबत गुरु आणि शुक्राचीसुद्धा दृष्टी राहील. मकर राशीमध्ये चंद्र आल्यामुळे शनीची वक्र दृष्टी राहील. चंद्रासमोर कर्क राशीत गुरु आणि शुक्र असल्यामुळे या दोन्ही ग्रहांची दृष्टी दिवसभर चंद्रावर राहील. या व्यतिरिक्त मिथुन राशीचा मंगळसुद्धा आठव्या दृष्टीने चंद्राकडे पाहत आहे.

या ग्रहांचा चंद्रासोबत संबंध आल्यामुळे सर्व राशींवर यांचा संमिश्र प्रभाव राहील. शनीच्या वक्रदृष्टीला अशुभ मानण्यात आले आहे. या स्थितीमुळे काही लोकांना तणावाला सामोरे जावे लागू शकते. गुरु आणि चंद्राच्या दृष्टीसंबंध शुभ मानला जातो. यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येतो. याच्या प्रभावाने दिवस चांगला जाऊ शकतो. हा योग धनलाभ आणि सुख देणारा आहे. चंद्रावर मंगळाची आठवी दृष्टीसुद्धा शुभ मानली जाते. अशाप्रकारे अनेक लोकांसाठी शुक्रवार चांगला दिवस ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजच दिवस...