आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

आज सर्व राशींवर काहीसा असा राहील राहू-चंद्राचा प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील शेवटचा दिवस काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी ठीकठाक राहील. गुरुवारी चंद्र राहुसोबत कन्या राशीत राहील. राहू आणि चंद्र एकाच राशीत असल्यास ग्रहण योग जुळून येतो. हा योग शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे फळ देतो. या योगाच्या शुभ प्रभावाने अचानक अडकेलेली कामे पूर्ण होतात. ग्रहण योगाच्या प्रभावाने काही लोकांना महत्त्वपूर्ण कार्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. या योगाच्या अशुभ प्रभावाने मानसिक तणाव, भीती आणि व्यर्थ चिंता राहते. जुने आजारही डोके वर काढू शकतात. ग्रहण योगामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये.

या व्यतिरिक्त आज चंद्र दिवसभर उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये असल्यामुळे मातंग नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि पदोन्नतीशी संबधित कार्य पूर्ण होऊ शकतात.

गुरुवारची ग्रहस्थिती -
सूर्य - मेष राशीमध्ये
चंद्र - कन्या राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध - वृषभ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृषभ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

कोणत्या राशीसाठी कसा राहील गुरुवार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...