आज शनि आणि चंद्राची जोडी विभक्त झाल्यामुळे दिवस चांगला राहील. यापूर्वी पाच तारखेला चंद्र वृश्चिक राशीमध्ये शनिसोबत आला होता. या राशीमध्ये चंद्र नीचेचा असतो. शनिसोबत चंद्र असल्यामुळे विष योग तयार जुळून येतो. हे दोन अशुभ योग आज नष्ट होत आहेत, कारण चंद्र आता धनु राशीमध्ये आहे. मागील दोन दिवसांमध्ये या अशुभ योगांमुळे मानसिक तणाव, धावपळ आणि नुकसान सहन करावे लागले. आता चंद्राने रास बदलल्यामुळे या योगाचा प्रभाव नष्ट झाला आहे.
धनु राशीमध्ये चंद्र आल्यामुळे आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे आज शिव योग जुळून येत आहे. हा योग कष्टाचे पूर्ण फळ देतो. या योगाच्या प्रभावाने ठरवलेली कामे पूर्ण होतात. धनु राशीचा चंद्र आज काही लोकांना धनलाभ करून देऊ शकतो. काही लोकांना आज अडकेलेला पैसा मिळू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...