आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

गुरुवार : जाणून घ्या, कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये; कसा राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सुकर्म नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने काही लोकांसाठी गुरुवार खास राहील. चंद्र रेवती नक्षत्रामध्ये राहील. सूर्योदयापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रेवती नक्षत्र राहील. या योगाच्या प्रभावाने मित्र नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येईल. मित्र योगाच्या प्रभावाने अनेकांसाठी आजचा दिवस शुभ राहील.

गुरुवारी सूर्य, बुध आणि मंगळ तिन्ही ग्रह मिथुन राशीमध्ये राहतील. हे तिन्ही ग्रह शुभ योग तयार करत आहेत. गुरु आपल्या उच्च राशीमध्ये असून शुक्र सिंह राशीत आहे. गुरूमुळे धनलाभ होईल. गुरुवारी सिंह राशीतील शुक्र अनेकांचा खर्च वाढवू शकतो. चंद्र आणि केतू मीन राशीत आहेत. हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या योगामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. कन्या राशीमध्ये राहू तर वृश्चिक राशीमध्ये शनि ग्रह आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील...