मंगळवारी चंद्र कन्या राशीमध्ये राहील. या राशीमध्ये पूर्वीपासूनच राहू आहे. आता चंद्र या राशीत आल्यामुळे ग्रहण योग सुरु झाला आहे. हा योग शुभ मानला जात नाही. या योगाच्या प्रभावामुळे लोकांना तणाव, भीती आणि अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या योगाच्या प्रभावाने लोकांची महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. शेवटच्या क्षणी चुकीचा निर्णय घेणे, हा योगः प्रभाव आहे.
या व्यतिरिक्त मंगळवारी चंद्र हस्त नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे सौम्य नावाचा योग जुळून येत आहे. हा योग शुभफळ प्रदान करतो. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होतो. एखादी आनंदाची बातमी समजू शकते. अशाप्रकारे एक शुभ आणि एक अशुभ योगाचा संमिश्र प्रभाव सर्व राशींवर राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...