मंगळवारची ग्रहस्थिती काही लोकांसाठी चांगली राहील. ग्रह आणि योग-संयोगाच्या प्रभावाने काही लोकांचे टेन्शन दूर होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. अडकेलेला पैसाही परत मिळेल. मंगळवारी पुनर्वसु नक्षत्र असल्यामुळे स्थिर नावाचा एक शुभ योग जुळून येईल. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. अनेक राशींना या योगाचा लाभ होईल.
या व्यतिरिक्त मंगळवारी मंगळ आणि शुक्र कर्क राशीत राहतील. या ग्रह युतीच्या प्रभावाने वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांना फायदा होईल. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहावे. सिंह राशीतील गुरु आणि सूर्याच्या प्रभावामुळे सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. वृश्चिक राशीतील शनि काही लोकांना अडचण निर्माण करू शकतो. कन्या राशीतील बुध आणि राहू काही लोकांना फायदा करून देऊ शकतात. पुढे जाणून घ्या, नऊ ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...