बुधवारी म्हणजे आज दिवसभर दोन शुभ योग राहतील. बुधवारी चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये असल्यामुळे सौम्य नावाचा शुभ योग जुळून येईल. या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दररोज जुळून येणाऱ्या शुभ-अशुभ योगांमधील एक सिद्धी नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या दोन्ही शुभ योगांच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली सर्व कामे पूर्ण होण्यास मदत होईल.
या दोन शुभ योगांव्यतिरिक्त आज शनि आणि चंद्राची जोडी वृश्चिक राशीमध्ये असल्यामुळे काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज शुक्र आणि शनिच्या दृष्टीमुळे व्यर्थ खर्च वाढू शकतो.
शिवलिखित शुभमुहूर्त
०६.२९ ते ०८.०२ लाभ.
०८.०२ ते ०९.३५ अमृत.
११.०८ ते १२.४१ शुभ.
१७.२१ ते १८.५४ लाभ.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...