बुधवारी दिवसभर पुष्य नक्षत्र राहील. पुष्य नक्षत्र असल्यामुळे मातंग नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील आणि याच्या प्रभावाने अनेक लोकांना फायदा होऊ शकतो. मातंग योग धन वृद्धी करणारा योग आहे. या व्यतिरिक्त बुधवारी चंद्र स्वराशीतच राहील. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीमध्ये पूर्वीपासूनच शुक्र आणि मंगळ सोबत आहेत. आता चंद्र आल्यामुळे तीन ग्रह एकत्र आले आहेत. मंगळ आणि चंद्राच्या युतीने लक्ष्मी योग जुळून येतो. कर्क राशीतील चंद्र आणि पुष्य नक्षत्राच्या योग एकत्र आल्यामुळे अनेक लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. पुढे जाणून घ्या, बुधवारची ग्रहस्थिती आणि शुभ योगाचा प्रभाव कोणत्या राशीसाठी कसा राहणारा.
जाणून घ्या, बुधवारी कोणता ग्रह कोणत्या राशीमध्ये राहणार...
सूर्य- सिंह राशीमध्ये
चंद्रमा- कर्क राशीमध्ये
मंगळ- कर्क राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये