आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यातील शेवटचा दिवस : जाणून घ्या,आजच्या योगाचा प्रभाव कसा राहील तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिन्यातील शेवटच्या दिवशी (३१ जानेवारी) व्यतिपात योग आहे. या योगाचे स्वामी रुद्र आहेत. रुद्राचे स्वामित्व असलेला हा योग आपल्या नावानुसार फळ देतो, म्हणजे अशुभ फळ आणि वाईट कर्माची शिक्षा देणारा हा योग आहे. या योगामध्ये कोणतेही काम यशस्वी होत नाही. व्यतिपात योग ३१ जानेवारीला रात्री ३.३० पासून सुरु होऊन १ फेब्रुवारीला रात्री १२.२२ पर्यंत राहील.

या योगामध्ये काय करू नये -
दिवसभर हा योग असल्यामुळे मंगल कार्य करू नये. या योगामध्ये कोणालाही उसने पैसे देऊ नका किंवा घेऊ नका. महत्वाची कामे शक्यतो टाळावीत. या योगामध्ये कोणत्याही प्रकारची खरेदी करू नये.