आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

गुरुवारी जुळून येणार 3 शुभ योग, राशीनुसार काय करावे-काय करू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी चंद्राच्या स्थितीमुळे 3 शुभ योग जुळून येत आहेत. या तिन्ही शुभ योगांच्या प्रभावाने अनेक लोकांसाठी गुरुवार लकी ठरू शकतो. गुरुवारी संपूर्ण दिवस चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये असल्यामुळे धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग राशीनुसार काही लोकांचा अडचणींपासून बचाव करेल. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दररोज जुळून येणाऱ्या शुभ-अशुभ योगांमध्ये गुरुवारी इंद्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने सुख वाढेल आणि एखादी चांगली बातमी समजेल.

या दोन शुभ योगांव्यतिरिक्त धनु राशीच्या चंद्रावर मिथुन राशीतील मंगळाची पूर्ण दृष्टी राहील. मंगळ आणि चंद्राच्या दृष्टीसंबंध लक्ष्मी योग तयार करत आहे. लक्ष्मी योगामध्ये बिझनेस आणि नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. राशीनुसार काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी आजचे तीन शुभ योग कसे राहतील...