आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav On August 10 Celebrate Rakhi Festiwal Afternoon, Know Auspicious Time.

राखीपौर्णिमेला दुपारी बांधावी लागणार राखी; पाहा, रक्षाबंधनासाठी कोणता आहे शुभ मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन- श्रावणातील पोर्णिमेला राखीपोर्णिमेचा सण म्हणून साजरा केले जाते. यावेळी हा सण 10 ऑगस्ट रविवारी आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, यावेळी राखीपोर्णिमेवर भ्रद्रा योग आहे, यामुळे दोपारनंतरच राखीपोर्णिमा पर्व सुरू होईल, म्हणून बहिणीं आपल्या भावांना दुपारनंतरच राखी बांधू शकतील.
उज्जैनचे जोतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्टच्या सकाळी 6.05 मि. सुर्योदयापासून रात्री 11.38 पर्यंत पोर्णिमा तसेच सूर्योदयापासून रात्री 10.39 पर्यंत श्रावण नक्षत्राचा संयोग आहे. ज्यामध्ये तुम्ही राखी बांधू शकतात. मात्र 9 ऑगस्टच्या पहाटे 3.35 वाजेपासून 10 ऑगस्टच्या दुपारी 1.37 वाजेपर्यंत भद्रा काळ राहणार आहे.
जसे की, शास्त्रांमध्ये भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्जीत आहे. त्यामुळे 10 ऑगस्टच्या दुपारनंतरच राखी बांधणे शास्त्रानुसार योग्य राहिल. यामुळेच दुपारी 1.37 वाजता भद्रा काळ संपल्यानंतर रात्री 10.39 वाजेपर्यंत रक्षाबंधन करणे शुभ आहे. अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात केवळ 9 तास 2 मिनिटांचा शुभ मुहूर्त राहणार आहे.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त
दुपारी 1.37 ते 3 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त
संध्याकाळी 7 ते 8.30 पर्यंत शुभ मुहूर्त
आणि रात्री 8.30 ते 10 वाजेपर्यंत अमृत मुहूर्त
पुढील स्लाईडवर वाचा, भद्रा काळात राखी का बांधत नाहीत?
सर्व फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.