आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Life रोमॉंटिक बनवण्यासाठी या वास्‍तु टिप्‍स ठरतील लाभदायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैवाहिक जीवनात बेडरूमचे अत्यंत वेगळे स्थान आणि महत्त्व असते. दाम्पत्यामध्ये असलेल्या खासगी बाबी शेअर करण्‍याचे ते महत्त्वाचे ठिकाण असते. बेडरूम जर वास्‍तुशास्‍त्राच्‍या नियमानुसार नसेल तर त्‍याचे परिणाम आपल्‍या जीवनावर होत असतात. विशेषतः लव्‍ह लाईफवर त्याचा परिणाम होत असतो. आज आम्‍ही तुम्‍हाला लव्‍ह लाईफमध्‍ये अडचणी येणार नाहीत यासाठी काही खास वास्‍तू टिप्‍स सांगणार आहोत. या टिप्‍सचा वापर केल्‍यानंतर पती-पत्‍नीमध्‍ये वाद होणार नाहीत. शिवाय संसारीक सुख मिळण्‍यासाठी लाभदायक ठरतील.
रोमँटीक लव्‍ह लाईफसाठी टिप्‍स-
1- सूर्यप्रकाश बेडरूममध्‍ये येण्‍यासाठी बेडरूममध्‍ये खिडकी असायला हवी. सूर्यप्रकाश आरोग्‍यासाठी लाभदायक असतो. बेडरूमध्‍ये झोपताना दाराकडे पाय करून झोपायला हवे. बेडच्‍या अगदी समोर आरसा असेल तर तो काढून टाका. यामुळे तुम्‍हाला त्रास होतो, असे वास्‍तुशास्‍त्रात सांगण्‍यात आले आहे.
2- बेडरूम सुंदर आणि स्‍वच्‍छ ठेवा. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होईल. जर तुमच्‍या जीवनात सुख, शांती, समाधान नसेल तर बाऊलमध्‍ये पवित्र क्रिस्‍टलसोबत तांदूळ ठेवा.
आणखी वास्‍तू टिप्‍स जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...