आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Can Do These Measures For Worshiping To The Sun

कुंडलीत सूर्य अशुभ असेल तर करू शकता हे अचूक आणि सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज सकाळी सूर्यदेवाची उपासना करणे आवश्यक आहे. जे लोक नियमितपणे सूर्यदेवाची उपासना करतात त्यांना समाजात मान-सन्मान तसेच सर्व कामामध्ये यश प्राप्त होते असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य मान-सन्मान, प्रतिष्ठा कारक ग्रह आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती ठीक नसेल तर त्याला समाजात मान-सन्मान मिळत नाही. या ग्रहाचे शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय तुम्ही करू शकता.

दररोज सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा उच्चार करावा. हा खूप सोपा आणि अचूक उपाय आहे.

मंत्र-
1. ऊँ सूर्याय नम:
2. ऊँ आदित्याय विदमहे दिवाकराय धीमहि तन्नौ: सूर्य: प्रचोदयात्।
3. ऊँ आदित्याय नम:

यापैकी कोणत्याही एका मंत्राचा दररोज एक माळ जप केल्यास लाभ होईल. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा. पवित्र, शांत ठिकाणी आसनावर बसून या मंत्राचा जप करावा.

सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....