आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

बुधवार : उच्च राशीमध्ये मंगळ आणि वक्री गुरु, वाचा शुभ-अशुभ राशीफळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार रात्रीपासून गुरु वक्री झाला आहे. आता गुरु स्वतःच्या उच्च राशीमध्ये आहे. गुरुसोबत चंद्र असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाचा शुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. गजकेसरी योगामध्ये खरेदी आणि देण्या-घेण्याचे व्यवहार करणे शुभ मानले जाते.

या व्यतिरिक्त गुरु आणि चंद्रासमोर मकर राशीत मंगळ आहे. मंगळही स्वतःच्या उच्च राशीत स्थित आहे. मंगळ आणि चंद्राचा पूर्ण दृष्टी संबंध जुळून येत आहे. जेव्हा-जेव्हा चंद्र आणि मंगळ एकमेकांकडे पाहतात तेव्हा-तेव्हा लक्ष्मी योग जुळून येतो. या शुभ योगानेही धनलाभ होतो. चंद्र , मंगळ आणि गुरु तिघेही मित्र ग्रह आहेत. आज सूर्य, शनि आणि बुध हे तिन्ही ग्रह एकत्रितपणे वृश्चिक राशीत स्थित आहेत. सूर्य आणि शनि एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. वृश्चिक राशीमध्ये हे दोन ग्रह असल्यामुळे काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संपूर्ण दिवस काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ राहू शकतो.

तुमचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)