आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Rashibhavishya Of Shubh Yog Astrology Moon Zodiac And Planets Position

बुधवार : जाणून घ्या, कोणत्या तीन ग्रहांचा प्रभाव आहे तुमच्या राशीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र, गुरु आणि मंगळ त्रिकुटाचा आज सर्व राशींवर प्रभाव राहील. आज चंद्र स्वतःच्याच म्हणजे कर्क राशीत असेल. या राशीत पूर्वीपासूनच गुरु ग्रह स्थित आहे. या राशीमध्ये गुरु उच्चेचा असतो. कर्क राशीमध्ये गुरु आणि चंद्र एकत्र असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग दिवसभर राहील. या योगामध्ये सुरु केलेले कार्य वेळेवर पूर्ण होते. या योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि पद-प्रतिष्ठा प्राप्त होते.

या व्यतिरिक्त आज मंगळाची आठवी दृष्टी कर्क राशीच्या चंद्रावर आहे. चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. हा योग नावानुसार धनलाभ करून देतो. हा योगही दिवसभर राहील. अशा प्रकारे हे तिन्ही योग पूर्ण दिवस शुभ करत आहेत.

आजची ग्रहस्थिती -
सूर्य - तूळ राशीमध्ये
चंद्र - कर्क राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृश्चिक राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या या तीन शुभ योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)