Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi

मे महिन्यातील शेवटचा दिवस : काहीसा असा राहील तुमच्यासाठी

जीवनमंत्र डेस्क | Update - May 31, 2017, 01:07 PM IST

बुधवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग जुळून आला आहे. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे व्यघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे.

 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  बुधवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग जुळून आला आहे. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे व्यघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या दोन अशुभ योगांचा प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या योगामुळे टेन्शन, चुकीचे निर्णय, वाद आणि धनहानी होऊ शकते. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस....

 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  मेष - खर्च वाढता असला तरीही आर्थिक लाभही होणार आहेत. घरात सजावटीवर पैसा खर्च होईल. नोकरीत बदल करु इच्छीत असणाऱ्यांना योग्य संधी येतील.  शुभ रंग: निळा, अंक-४.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  वृषभ - संमिश्र ग्रहमानाचा आजचा दिवस. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. काही प्रकृतीच्या तक्रारी त्रस्त करतील. महत्वाचे कागदपत्र हरवण्याची शक्यता आहे. शुभ रंग : तांबडा, अंक-१.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  मिथुन - व्यवसायात अडकलेला पैसा वसूल होईल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. आज गप्पांतून गैरसमज वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. शुभ रंग : केशरी, अंक-२.   
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  कर्क - अहंकार वाढविणारी घटना घडेल. आज कोणत्याही प्रसंगी स्वत:च्या मतावर ठाम रहाल. कठोर शब्दप्रयोग टाळा कारण त्याने नाती दूरावतील. शुभ रंग : हिरवा, अंक-६. 
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  सिंह - उगीचच त्रागा करु नका. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणं शक्य नाही. पर्यटनाची इच्छा पूर्ण होईल. गृहीणींचे आवडत्या छंदात मन रमेल. शुभ रंग : पांढरा, अंक-५.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  कन्या - जोडीदाराच्या कतृत्वाचा अभिमान वाटेल. आज खिशात पैसा खेळता असल्याने उच्च रहाणीमानास प्राधान्य द्याल. प्रिय व्यक्तिसह हौसमौज कराल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-3.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  तूळ - आज तुमचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या घटना घडतील. राजकारणी शत्रूपक्षाला पुरुन उरतील. आज विद्यार्थी गुरुंच्या व पालकांच्या आज्ञेत राहतील. शुभ रंग : राखाडी, अंक-८.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  वृश्चिक - नोकरदारांनी वरीष्ठांशी वादविवाद टाळावेत. घरातील वयस्कांचेही मूड सांभाळणे गरजेचे. आज अचानक दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. शुभ रंग : पिवळा, अंक-3.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  धनू - उद्योग व्यवसायात वाढत्या जबाबदाऱ्या त्रासदायक होतील. आर्थिक तराजूही डळमळीत होईल. उपासनेचा जोर वाढवावा लागेल. कोणतेही धाडस नकोच. शुभ रंग : मोरपंखी, अंक- 7.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  मकर - आज कोणत्याही स्पर्धा व चढाओढीत अटीतटीची झुंज राहील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी कार्यसाधक होतील. संध्याकाळी फक्त जोडीदारास वेळ द्या. शुभ रंग : आकाशी, अंक-५.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  कुंभ - अनावश्यक खर्चात कपात करणे गरजेचे आहे. मुलांकडून काही सुवार्ता येतील. तब्येत थोडी नरमच असेल. काही येणी असली तर वसूल होतील. शुभ रंग : गुलाबी, अंक-१.
 • Wednesday 31 may 2017 daily horoscope in marathi
  मीन - सौदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. शेअर्स व्यवहारांतून फायदा होईल. नव्या ओळखींतून व्यवसाय व़ृध्दी होईल. प्रेमी युगुलंना ग्रीन सिग्नल. शुभ रंग : जांभळा, अंक-९

Trending