तुमच्या आरोग्य, पैसा, / तुमच्या आरोग्य, पैसा, लव्ह-लाईफ, करिअरसाठी कसा राहील हा आठवडा

May 31,2017 02:03:00 PM IST
29 मे ते 24 जूनपर्यंतचा काळ मेष, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास राहील. या 7 राशीच्या लोकांना हा काळ फायदा करून देणारा राहील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना एक्स्ट्रॉ इनकम होऊ शकते. गुंतवणूक, आर्थिक व्यवहार आणि कागदोपत्री कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकासांठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. मेच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला चंद्र कर्क राशीपासून कन्या राशीपर्यंत जाईल. यामुळे बहुतांश लोकांसाठी हा काळ चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा....
मेष उत्पन्नात सुधारणा अणि कामे वेळेवर पार पडतील. मित्र ग्रहांचे सहकार्य मिळत आहे. अडकलेल्या कामांनाही गती येईल. योजना मार्गी लागतील. उत्साहवृद्धीसोबत बुध आणि गुरुवारी अज्ञात भीती असू शकते. मित्रांची मदत मिळेल. नव्या कामाची योजना बनू शकते. काही प्रमाणात यशही मिळेल. नोकरी व व्यवसाय : व्यवसाय उत्तम व नोकरीत अधिकारी प्रसन्न राहतील. शिक्षण : अभ्यासात पुढे राहाल. संसाधने उपलब्ध होतील. आरोग्य : नसांत तणाव. कंबर व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रेम : सहकाऱ्याचा अनादर होऊ शकतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्रत : श्रीराम आणि सीतेचे दर्शन घ्या.वृषभ चंद्राचे गोचर तुमचे उत्पन्न चांगले ठेवेल. कौटुंबिक प्रकरणांत यश मिळेल. नवी कामे मिळतील. सहकार्य मिळेल. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. गुरुवारी, शुक्रवारी वाहनाशी संबंधित अडचणी. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. शनिवार चांगला राहील. व्यवसाय आणि व्यापार : व्यापारात उत्पन्न वाढेल. नोकरीत संधी मिळतील. शिक्षण : अभ्यासासाठी वेळ मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी चांगली होईल. आरोग्य : दात, कान, डोळ्यांच्या समस्या. कफाचा त्रास संभवतो. प्रेम : प्रेम प्रस्तावात यश मिळेल. वैवाहिक सुख मिळेल. व्रत : दुर्गा चालिसाचा पाठ करा.मिथुन मंगळ-चंद्राच्या युतीने धनाची आवक वाढेल. कामांना वेग येईल आणि यश मिळेल. वादग्रस्त प्रकरणात विजय मिळेल. कुटुंबीयांची साथ असेल आणि प्रसन्नताही लाभेल. आठवड्यात सांभाळून राहावे लागेल. वाहनाचा उपयोग सतर्कतेने करा. नोकरी व व्यवसाय : व्यापार उत्तम राहील. नोकरीत सहकार्य मिळेल. शिक्षण : अपेक्षेनुरूप निकाल. स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य : डोकेदुखी, डोळ्यात जळजळ, दाढ व त्वचेसंबंधी आजार होईल. प्रेम : सहकाऱ्याशी वाद, जोडीदाराशी तणाव वाढू शकतो. व्रत : गणपतीला खिरीचा नैवेद्य दाखवा.कर्क नोक सुरुवातीला अडचण येईल. गरजेपेक्षा कमी वस्तू मिळतील. उत्पन्नात घसरण होऊ शकते. मंगळवारपासून कामांत वेग येईल. तणाव कमी होईल आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. बुधवार आणि गुरुवार सर्व प्रकारे चांगले राहतील. घर किंवा वाहन खरेदीची योजना तयार होईल. व्यवसाय आणि व्यापार : व्यवसाय सामान्य. नोकरीत नावडीची कामे होतील. शिक्षण : अभ्यास चांगला राहील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. आरोग्य : मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या राहू शकते. जखम होईल. प्रेम : अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव. वैवाहिक जीवन सुखमय राहील. व्रत : श्री राधाकृष्ण मंदिरात तुपाचा दिवा लावा.सिंह मंगळ व बुधवार हे दिवस अडचणीचे अाहेत. वाद होऊ शकतात. उत्पन्न घटेल आणि अनावश्यक खर्च वाढेल. गुरुवारपासून स्थिती पूर्ववत होईल. उत्पन्नात सुधारणा होईल व सहकार्यही मिळेल. एखादे मोठे काम होण्याची शक्यता आहे. प्रवास सुखद होईल आणि नवे संपर्क लाभदायक ठरतील. नोकरी व व्यवसाय : व्यापारात यश. नोकरी बदलण्याची इच्छा होईल. शिक्षण : अभ्यासात पुढे राहाल. पण, आळस मध्ये येईल. निकाल आपल्या बाजूने. आरोग्य : पोट, कंबर आणि डावा गुडघा दुखण्याचा त्रास होऊ शकतो. प्रेम : सहकाऱ्याशी वाद. वैवाहिक आयुष्यात माधुर्य राहील. व्रत : १० वेळा हनुमानचालिसाचे वाचन करा.कन्या विचार उच्च राहतील. सर्वांना मदत करावी, असे वाटेल. उत्पन्न चांगले राहील. कामे वेळेवर होतील. गुरुवारी आणि शुक्रवारी जवळचे लोक धोका देऊ शकतात. शुक्राची दृष्टीही हटेल. काम करण्यात अडचणी जाणवतील. शनिवारी दिलासा मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसाय आणि व्यापार : व्यापारात अडचणी येतील. नोकरीत नवे प्रस्ताव मिळतील. शिक्षण : अभ्यासात एकाग्रता कायम राहील. आरोग्य : केस, त्वचा, पोट, कमरेच्या समस्या राहू शकतात. प्रेम : प्रेम स्वीकारले जाईल. वैवाहिक सुख राहील. व्रत : श्री गणेशाला तुपाचा दिवा लावा.तूळ बुधाची कृपा असून शुक्रवारपासून शुक्राची कृपादृष्टी राहील. स्थिती सुधारेल आणि प्रलंबित काम होण्याची शक्यता आहे. चंद्राच्या कृपेने उत्पन्न चांगले राहील. अपेक्षित सहकार्य मिळेल. नव्या कामाकडे आकर्षित व्हाल. विदेशी जाणाऱ्यांना यश. शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी दिवसभर भीती राहील. नोकरी व व्यवसाय : व्यापारात गती. नोकरीत सहकार्य मिळेल. शिक्षण : अभ्यास सतत सुरू असेल. मन लागेल. संसाधने उपलब्ध होतील. आरोग्य : डोळे, कंबरदुखीचा त्रास. फोड वगैरे येण्याची शक्यता. प्रेम : सहकाऱ्याकडे आकर्षित व्हाल. जोडीदाराशी माधुर्य राहील. व्रत : दुर्गा मातेला कुंकू आणि चंदन अर्पण करा.वृश्चिक राशी स्वामी मंगळ आणि चंद्र आठवा आहे. मंगळवारपर्यंत उत्पन्नात अडथळे येतील. कामातही अडथळे येतील. त्यानंतर सुधारणा होईल. धार्मिक कामांत सहभागी होण्याची संधी मिळेल. वादात विजय मिळेल. संपर्काचा फायदा मिळेल आणि आठवडाअखेर मोठा लाभ होऊ शकतो. व्यवसाय आणि व्यापार : व्यापार मध्यम राहील. नोकरी बदलावी वाटेल. शिक्षण : अपेक्षित निकाल मिळणार नाही. मनाजोगा विषय मिळण्यात अडचण. आरोग्य : चेहऱ्यावर जखम होऊ शकते. वाहन आणि विजेपासून सावध राहा. प्रेम : जोडीदाराशी वाद शक्य. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. व्रत : शिवलिंगावर अक्षत आणि जल अर्पण करा.धनू वक्री शनी तसेच मंगळ आणि चंद्राची कृपा आहे. प्रतिष्ठा वाढवेल. उत्पन्न चांगले राहील. पण, मंगळ व बुधवारी नुकसानीसोबत शेजाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे. गुरुवारी फायदा होईल. आठवड्यात सुखद बातमी मिळेल. कुटुंबीयांसोबत वेळ जाईल आणि प्रसन्नता राहील. नोकरी व व्यवसाय : व्यापार उत्तम राहील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. शिक्षण : संसाधनांची उणीव. शिक्षणावरून वाद. आरोग्य : डावी दाढ दुखेल. खांदा व पाठीचाही त्रास होऊ शकतो. प्रेम : सहकाऱ्याचे सहकार्य. वैवाहिक आयुष्य सुखद राहील. व्रत : सरस्वतीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.मकर मंगळाची दृष्टी आहे. चंद्र अनुकूल आहे. उत्पन्न चांगले राहील. कामे व्यवस्थित होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. गुरुवारी प्रवासात समस्या येऊ शकतात. शुक्रवारी उत्पन्न कमी असेल. चिंता जाणवेल. शनिवारी आनंद होईल. प्रवासाला जाण्याची संधीही मिळेल. व्यवसाय आणि व्यापार : व्यवसायात अडचणी. नोकरीत बदलीचे योग. शिक्षण : अभ्यासात पुढे राहाल. उच्च शिक्षणात इच्छेनुसार संस्था मिळेल. आरोग्य : डाव्या हातात वेदना आणि वाताचा प्रकोप होऊ शकतो. प्रेम : जोडीदाराचा व्यवहार योग्य राहील. वैवाहिक संबंधांत सुधारणा होईल. व्रत : हनुमानाला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवा.कुंभ नशिबाची साथ मिळेल व चंद्राच्या कृपेने उत्पन्नात सुधारणा होईल आणि कामांना गती येईल. नवकार्याची योजना बनू शकते. सहकार्यही मिळेल. विरोधक हताश होतील. गुरू व शुक्रवार सुखद राहील आणि चहूबाजूंनी यश मिळेल. शनिवार चिंताजनक ठरू शकतो. दस्तऐवज किंवा किमती वस्तू हरवू शकते. नोकरी व व्यवसाय : व्यापार सामान्य. नोकरीत अधीनस्थांच्या अडचणी. शिक्षण : अध्ययनात अडचणी. सहकार्याची अपेक्षा निरर्थक. आरोग्य : दुखापतीची शक्यता. डोळे व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रेम : सहकाऱ्याची भेट. जोडीदारापासून दूर राहावे लागू शकते. व्रत : गणपतीला नारळ अर्पण करा.मीन शुक्रवारी शुक्राची दृष्टी होईल. काळ अनुकूल राहील. उत्पन्न चांगले राहील. कामांतही वेग येईल. गुरुवारी आणि शुक्रवारी मन खिन्न राहू शकते. भविष्याबद्दल चिंता वाढू शकतात. शनिवारी चांगल्या बातमीमुळे आनंदी राहाल. भावांकडून सहकार्य मिळेल. व्यवसाय आणि व्यापार : व्यापार चांगला राहील. नोकरीत प्रवासाचा योग. शिक्षण : अभ्यासातून मन उडू शकते. सहकार्य मिळणार नाही. आरोग्य : पायाला जखम, गळ्यात खरखर आणि कफाची समस्या शक्य. प्रेम : जोडीदाराशी वाद होतील. जीवनसाथीचे सहकार्य कायम राहील. व्रत : लक्ष्मी-नारायणाला सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवा.
X