आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 ते 22 नोव्हेंबर : 2 ग्रह बदलणार राशी, काहीसा असा राहील आठवडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्याची सुरुवातच सूर्याच्या रास परिवर्तनाने होत आहे. 17 तारखेला सूर्य आणि बुध वृश्चिक राशीमध्ये शनिसोबत येतील. या ग्रहस्थितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडेल. सूर्य आणि शनि एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह एकाच राशीत असणे शुभ मानले जात नाही. यांच्या प्रभावाने वाद, कलह, नुकसान, मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. शनि बुध एकत्र आल्यामुळे शेअर मार्केट, वायदे बाजार, मिशनरीचे काम करणाऱ्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा काळ चढ-उताराचा राहू शकतो. विमा कंपनीत काम करणाऱ्या, बँकिंग, कोर्ट आणि गुत्तेदारी करणाऱ्यांसाठी हे सात दिवस खास राहतील.

या सात दिवसांमध्ये चंद्र धनु राशीतून मीन राशीपर्यंत जाईल. आठवड्याच्या मध्यात चंद्र जवळपास अडीच दिवस मकर राशीत असताना त्यावर शनीची वक्रदृष्टी राहील. हे दोन दिवस काही लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. या व्यतिरिक्त इतर ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ-अशुभ फळांचा प्रभाव कमी-जास्त प्रमाणात राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...