नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या सात दिवसांमध्ये शुक्र आणि मंगळ रास परिवर्तन करतील. या ग्रहस्थितीमुळे सर्व राशींसाठी खास राहील हा आठवडा. 3 तारखेला मंगळ कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. या राशीमध्ये पूर्वीपासूनच राहू असल्यामुळे अंगारक योग जुळून येईल. या योगाच्या प्रभावाने काही लोकांच्या दिनचर्येत अचानक बदल घडू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या काही लोकांसाठी हा योग खास ठरू शकतो. नोकरदार लोकांनाही अचानक बढतीची बातमी मिळू शकते. या योगाच्या प्रभावाने मोठा धनलाभही होऊ शकतो.
या व्यतिरिक्त शुक्र ग्रहसुद्धा कन्या राशीत प्रवेश करेल. या राशीमध्ये ग्रहांचे त्रिकुट जुळून आल्यामुळे काही लोक अडचणीत पडू शकतात. परंतु शुक्राचे रास परिवर्तन काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या ग्रहाच्या शुभ प्रभावाने भोग-विलास, सुख, प्रेम आणि पैसा प्राप्त होतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हे सात दिवस कोणत्या राशीसाठी कसे राहतील...